The history of two thousand years ago is neglected : बावडी आणि मंदिरांना लावले कुलूप
Nagpur नागपूरच्या झिरो माइलपासून अवघ्या ३७ किलोमिटर अंतरावर नगरधनचा किल्ला आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा बोलका इतिहास आहे. भुईकोट प्रकारात मोडणाऱ्या येथील किल्ल्याची लाल इमारत सर्वांचं लक्ष वेधून घेते. मात्र शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. किल्ला देखणा असला तरी येथे जागोजागी कचरा पडलेला आढळून येतो. येथील बावडी आणि मंदिरांनाही कुलूप लावून ठेवण्यात आले आहे.
किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने पावलं उचलली आहेत. आपला वैभवशाली इतिहास युवा पिढीला कळावा यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. मात्र काही किल्ले, ठिकाणांकडे अद्याप शासनाचे, प्रशासनाचे लक्ष नसल्याची खंत व्यक्त होऊ लागली आहे. त्यातीलच एक म्हणजे नागपूरच्या जवळ असलेला रामटेक तालुक्यातील नगरधन किल्ला.
Wardha Police : ठाणेदारांच्या मध्यस्थीने उघडले देवस्थान कार्यालयाचे कुलूप
या परिसरात वाकाटककालीन पुरावशेष असलेली स्थळे आहेत. नगरधन किल्ल्याचे जतन पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र आता देखरेख करण्यात काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या परिसरात वाकाटकांच्या काळातील वैभव जाणून घेण्यासाठी वारंवार उत्खनन करण्यात आले. काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन केले. त्यात पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने उत्खननात सापडलेल्या वस्तुंचा अभ्यासही करण्यात आला होता.
नगरधन नव्हे नंदिवर्धन
वाकाटक राजवंशाच्या काळात याचे नाव नंदिवर्धन असल्याचा पुरावा मिळतो. याच नावाचा अपभ्रंश होऊन नगरधन असे नाव पडले. हा किल्ला गोंड काळातील समजला जातो. त्यानंतर भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. हा भूईकोट किल्ला अतिशय प्रशस्त व मजबूत बांधणीचा आहे.
Question of abandoned bodies : वर्षभरात २५ मृतदेहांवर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार!
संरक्षित स्मारक तरीही
प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला कमलपुष्प कोरलेली आहेत. या किल्ल्यात अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. गोंड राजाचा किल्ला म्हणून ओळख असलेल्या या किल्ल्यात पायऱ्यांची बावडी आहे. याचबरोबर येथे भुयारी मार्ग, अंधार कक्ष, जिना असे स्थापत्य आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे. या किल्ल्याचे पुरातत्वीय व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.
प्रभावती गुप्त यांचे योगदान
तिसऱ्या व चौथ्या शतकात विदर्भाच्या सांस्कृतिक विकासात वाकाटक राज्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मध्य व दक्षिण भारतातील मोठ्या भुभागावर राज्य केले. नंदिवर्धन शाखा ही वाकाटकांची आद्य शाखा म्हणून ओळखली जाते. त्यांनी पूर्व विदर्भात राज्य केले. वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्त हीची मातीची मुद्रा नगरधन येथील उत्खननातून प्राप्त झाली.








