Transform agriculture with futuristic approach : शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान
Amravati येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन शेतीमध्ये बदल करणे आणि त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कमलताई गवई आदी उपस्थित होते.
कृषी आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातूनच मागास भागाचा बदल घडविणे शक्य झाले. सामाजिक सुधारणा या काळ बदलविणाऱ्या असतात. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळते. समाजाप्रती त्यांचा असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करण्यात येत आहे, असं गडकरी म्हणाले.
Shivaji Education Society : शरद पवार आणि नितीन गडकरी एका मंचावर
शेतीच्या क्षेत्रात जगभरात होत असलेल्या प्रयोगाची माहिती घेऊन त्यानुसार आपल्यातही बदल घडून येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनाही शेतीमध्ये बदल घडविताना आधुनिक शिक्षण मार्गदर्शक ठरणार आहे. शेतीतील प्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी पुरस्काराची संकल्पना गरजेची आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी त्यांना प्रशिक्षणही देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच जवळचे लोक टार्गेट करत आहेत !
मला मिळालेल्या रकमेत आणखी भर घालतो, पण
गडकरींना पाच लाख रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र त्यांनी पाच लाखात आणखी वीस लाख रुपयांची भर घालतो. या पैशांतून दरवर्षी पाच शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन गडकरींनी आयोजकांना केले. यापूर्वी शरद पवारांनी देखील अशाच प्रकारची भूमिका घेतली होती, हे विशेष.