Malpractices in Jaljeevan Mission scheme : मेहकर-लोणारमधील प्रकार; आमदारांनी केली कारवाईची मागणी
Buldhana जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पाणी पुरवण्याचा शासनाचा उद्देश आहे. असे असताना मेहकर-लोणार मतदारसंघातील या योजनेतील अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात विधानसभेत आमदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्याचवेळी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणे दुर्दैवी ठरेल, असंही आमदार म्हणाले.
मेहकर आणि लोणार तालुक्यांमध्ये तब्बल दीडशेच्यावर जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू आहेत. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही, बहुतांश कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विशेष म्हणजे, एकाच कंत्राटदाराला २८ कंत्राटे देऊन प्रशासनाने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे, असा आरोप करत मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानभवनात सरकारचे लक्ष वेधले.
Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा शंखनाद
सुरू असलेल्या १५० पैकी केवळ चार-पाच ठिकाणीच कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे अपूर्ण असून, अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी पाणीपुरवठ्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेला असून, जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलजीवन मिशन योजनेतील या भ्रष्टाचाराविरोधात सरकार काय पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
MLC Sanjay Khodke : विदर्भाच्या विकासासाठी श्वेतपत्रिका तयार करणार
“प्रशासनातील भ्रष्टाचारी लोकांमुळे शासनाच्या या उदात्त योजनेला तडा जात आहे. योजनेत झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. काम न करता देयके लाटणाऱ्या कंत्राटदारांकडून शासकीय निधीची रक्कम वसूल करावी,” अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानभवनात केली.