Opposition leader needed to provide justice to 14 crore people : चौदा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधी पक्षनेता हवा
Mumbai : संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे ही नियुक्ती तात्काळ करावी, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज (२४ मार्च) मुद्दा मांडला.
विधानसभा कामकाज कार्यपद्धतीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त मुद्दा मांडला. ते म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाके आहेत. यातील ही चाक म्हणजे विरोधी पक्षनेता आहे. हे चाक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नेमणूक केली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते, अशी परंपरा नाही. असे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यांना लगाम घालायला आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये अमित शाह यांना न माननारा एक गट !
विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याचे काम ती खुर्ची रिकामी ठेवून कामकाज होऊ नये. अध्यक्षांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, असेही काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी यांनी यावेळी सभागृहातील कामकाज हे नियमानुसार चालणार, तसेच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच जवळचे लोक टार्गेट करत आहेत !
विरोधी पक्षनेता नसल्याने सरकार बेलगाम होऊ नये. यासाठी सभागृहात विरोधी पक्षनेता असणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांना संख्याबळाचा विचार न करता हे पद भरावे. सुदृढ लोकशाहीसाठी हे आवश्यक असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाला सांगितले.