Breaking

Crime in Akola : पश्चिम विदर्भात गुन्हेगारांचा सुळसुळाट!

 

Law and order in danger in Western Vidarbha : कायदा-सुव्यवस्था धोक्यात, असुक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Akola पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून, अपहरण आणि पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लोकप्रतिनिधींच्या शांततेमुळे संताप व्यक्त होत आहे.

अकोला : रेल्वे स्थानकावर चोराचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीची हत्या. पत्नीचे मंगळसुत्र चोरून नेताना पाठलाग करणाऱ्यावर चोरांचा खुनी हल्ला.
खामगाव : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका युवकाचा खून. अन्य तिघे जखमी.
वाशिम : १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या.
बुलढाणा : दारू विक्रेत्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसाची हत्या.

या घटनांनी पोलिसांची कार्यपद्धती आणि सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवरील नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Crime in Akola : अकोल्यात ‘नीट’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या घटनांवर चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि शिवसेनेचे नितीन देशमुख यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करावा, अशी मागणी होत आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक सत्ताधारी आमदार असूनही पश्चिम विदर्भातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर कोणीही भाष्य करायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.

अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील पोलीस निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, पोलीस आणि प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर जनतेचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वाशिम येथील अपर्णाचा तपास करण्यासाठी पोलिसांना दहा दिवस लागले.

Crime in Akola : Cryptocurrency च्या नावाने तब्बल साडेचार कोटींची फसवणूक!

पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी लाच घेऊन काम करताना साथ वर्ष कारवाईसाठी लागत आहे. अकोला आणि अमरावती हे दोन्ही जिल्हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील असल्याने याकडे मात्र पोलीस यंत्रणा गांभीर्याने बघत नसल्याबाबत लोकप्रतिनिधी आवाज उठवणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहेत.