Breaking

Amravati Police : बोगस CS प्रमाणपत्राचे रॅकेट उघड; शिक्षिकेसह अनेक जाळ्यात?

 

Fake CS certificate racket exposed; Many including teacher caught in the trap? : बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांचा गैरवापर; जिल्हा प्रशासनासह पोलिसांची तपासणी सुरू

Amravati जिल्ह्यात बदलीसाठी सीएस (जिल्हा शल्यचिकित्सक) यांच्या नावाने बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. एका शिक्षिकेच्या प्रकरणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शेकडो शिक्षकांनी बदल्यांचा फायदा घेतला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील शिक्षिका बरडे यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावाने वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून बदलीचा लाभ घेतला होता. मात्र, विभागीय चौकशीत हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद सीईओ CEO आणि शिक्षणाधिकारी यांनी दिले.

शासनाने गंभीर आजार किंवा दिव्यांगत्व असलेल्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याची सवलत दिली आहे. मात्र, काही धूर्त आणि तंदुरुस्त शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रे मिळवून या धोरणाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. काही शिक्षक राजकीय प्रभाव वापरून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळवतात. बदल्यानंतर पुन्हा नवीन वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून पुन्हा बदली मिळवतात.

Amravati Police claims of NO Pendency : पोलिसांकडे तक्रारींची ‘नो पेंडन्सी’?

स्थानिक पंचायत समित्या आणि गटशिक्षणाधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. त्यामुळे मूलतः पात्र असलेल्या शिक्षकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागते, असेही ध्यानात आले आहे.

खामगावमध्येही प्रकरण उघड
अमरावतीप्रमाणेच खामगावमध्येही बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरव्यवहार उघड झाला आहे. १५०० रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र मिळते, अशी चर्चा सुरू झाली होती. सामान्य रुग्णालयातील डॉ. योगेश सिंधीकर यांनी काही प्रमाणपत्रांवर संशय व्यक्त केला. तपासणीअंती ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे खामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ACB Amravati : पोलीस शिपायानेच घेतली लाच!

या गंभीर प्रकरणानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस संवर्ग १ मधील सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. शिक्षक बदल्यांमध्ये सुरू असलेला हा संगनमताने चालणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.