Mungantiwar is the jewel of Chandrapur : सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणाले, ‘आम्ही मुनगंटीवार यांना ‘चंद्रपूरचे रत्न मानतो’
Chandrapur मंत्री म्हणून जनतेची सेवा कशी करायची याचे आदर्श उदाहरण म्हणून आम्ही सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्याकडे बघतो. त्यांना आम्ही ‘चंद्रपूरचे रत्न’मानतो, या शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी लोककला महोत्सवाचे कोरपना येथे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे देखील उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी मेट्रो प्रवासातून साधला लोकांसोबत संवाद
शेलार म्हणाले, ‘आज मी जिथे उभा आहे, ते महाराष्ट्राचे टोक आहे. पण आजचा कार्यक्रम बघून, आदिवासींची ऊर्जा बघून, लोकसाहित्य-संस्कृती बघून भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये आदिवासींचाच आवाज बुलंद होईल याची शाश्वती मिळत आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या आणि येथील आदिवासींच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन.’
आदिवासी लोककला महोत्सवाचा आवाज, येथील लोकगीते, संगीत-नृत्य, नाटिका संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जायचे आहे. चित्रपटांमध्येही आदिवासी संस्कृती प्रदर्शित झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल समीट मुंबईत होणार आहे. जगभरातील कलावंत, लेखक यात सहभागी होतील. तिथे आदिवासी लोककलांचे सादरीकरण करण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रण देतोय, असेही आशीष शेलार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : आणीबाणीत कारावास भोगणाऱ्यांचा सन्मान निधी वाढवा!
आदिवासी समाजाचे योगदान मोठे ठरणार – मुनगंटीवार
आदिवासी समाजात प्रचंड क्षमता आहेत. ते पराक्रमी आणि प्रामाणिक आहेत. कष्ट करायला कधीही मागेपुढे बघत नाहीत. या आदिवासी समाजाच्या योगदानातूनच देश प्रगतीच्या मार्गावर जाणार आहे, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
‘ऑलिम्पिक-२०३६’मध्ये आदिवासी तरुण असतील’
‘मिशन ऑलिम्पिक २०३६ मध्ये चंद्रपूर-गडचिरोलीचे आदिवासी तरुण-तरुणी झळकतील आणि देशासाठी पदक आणतील, असे वातावरण आपल्याला तयार करायचे आहे. त्यासाठी सरकार पूर्णपणे आदिवासी समाजाच्या पाठिशी उभे राहील, असा विश्वास आहे,’ असं मुनगंटीवार म्हणाले.








