Breaking

Prataprao Jadhav : आयुष उपचारांमुळे केसगळतीवर नियंत्रण

 

Hair loss disease controlled through AYUSH treatments : केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांचा दावा

Buldhana खामगाव आणि शेगाव तालुक्यांत अलीकडेच झालेल्या केसगळतीच्या प्रादुर्भावावर आयुष विभागाच्या उपाययोजनांनी मोठा दिलासा मिळाल्याचा दावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (आयुष) प्रतापराव जाधव यांनी केला आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी तज्ज्ञांना दिल्लीहून बोलावून विविध गावांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. आयुष उपचारांमुळे अनेक रुग्णांना सकारात्मक परिणाम जाणवले, असे त्यांनी नमूद केले.
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १२ एप्रिल रोजी शासकीय स्त्री रुग्णालयात आयुष विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. सॅम्युएल हॅनिमन अभिवादन व जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाधव होते. उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. कैलास झीने, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. भागवत भुसारी, डॉ. प्रशांत तांगडे, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ. राजेश जतकर, डॉ. अजित शिरसाठ, ओमसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

Prataprao Jadhav, Ravikant Tupkar : सगळे म्हणतात आम्हीच सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न!

 

जाधव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासाने आयुष विभागाची जबाबदारी मिळाली. हे खाते जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने मोठ्या जबाबदारीने कार्य सुरू केले आहे.”

भारताच्या परंपरागत वैद्यकीय पद्धतींना (आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्ध, योग) अधिक बळकटी देण्यासाठी देशभरात अनेक योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. एम्समध्येही आयुषचे उपचार सुरू होत असून ‘आयुष ग्राम’ संकल्पना राबवून ग्रामपातळीवर आरोग्यसेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Union Minister Prataprao Jadhav : आरोग्य तपासणीचा विश्वविक्रम!

कार्यक्रमात डॉ. दादासाहेब कवीश्वर व डॉ. भागवत भुसारी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी करताना, ना. जाधव व आ. संजय गायकवाड यांनी जिल्ह्याला मिळालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व राज्यातील पहिल्या होमिओपॅथी आरोग्य भवनासाठी मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार काढले.