Signs of a change in taluka-level leadership: तालुकास्तरीय नेतृत्वात फेरबदलाचे माजी मंत्र्यांचे संकेत
Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक घडामोडींना वेग येत आहे. तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक व माजी मंत्री प्रा. वसंत पुरके Vasant Purke यांनी दिले. मंगळवारी काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
काँग्रेस हायकमांडने यापूर्वीच कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले असून, काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून जबाबदारी सोडण्याचा संकेत दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रा. पुरके यांनीही यावेळी फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अपयशाची कारणेही या बैठकीत समजून घेण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, ब्लॉक व तालुका कमिटी तसेच विविध जनसंघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Arvind Sawant : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर!
या वेळी खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. “जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व आजही कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सत्ता कायम राखण्यासाठी संघटन अधिक बळकट करणे गरजेचे आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आवश्यकतेनुसार तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यात फेरबदल करणार,” असे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी स्पष्ट केले.
प्रा. वसंत पुरके यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीही स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे, वंदना कंगाले, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, भैय्या पवार, महिला काँग्रेस शहराध्यक्षा जयश्री वानखडे, कोषाध्यक्ष आनंदबाबू भामोरे, माजी शहराध्यक्ष संजय अकर्ते, नसीम खान पप्पू यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Ajit Pawar : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ !
या बैठकीत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय आगामी निवडणुकांचे नियोजन आणि पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना यावर भर देण्यात आला. हरिभाऊ मोहोड, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, दिलीप काळबांडे, संजय वानखडे, मार्डीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.