Breaking

Yavatmal BJP : भाजप लागले तयारीला, आज महत्त्वाची बैठक!

 

BJP started preperation for local body elections : यवतमाळ कोअर कमिटी मुंबईत, अध्यक्षपदाचा होणार निर्णय

Yavatmal भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त नावे असतील, तर त्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेतली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत तालुका आणि मंडळ अध्यक्षासह कोअर कमिटीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. एकूणच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला लागल्याचे चित्र आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने संघटन मजबुतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी तालुका स्तरावरील निवड प्रक्रिया कशी राबवायची याबाबत संहिता पक्षाने जाहीर केली आहे. त्यानुसार तालुका स्तरावरून शहर आणि ग्रामीण भागासाठी समिती गठित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेला प्रदेश कमिटी मंजुरी देणार आहे.

त्यासाठी १७एप्रिल रोजी मुंबईत यवतमाळ भाजपा कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निवड झालेल्या समितीच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे या बैठकीकडे जिल्हाभरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आज १७ एप्रिल रोजी मुंबईत यवतमाळ भाजपची बैठक होणार आहे.

BJP Janata Darbar : भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार !

तालुकाध्यक्ष आणि मंडळाध्यक्ष निवडीमध्ये त्यांच्या वयाची मर्यादा ३५ ते ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे. सदर पदाधिकारी चार वर्षापूर्वीपासून पक्षासोबत जुळलेला असणे आवश्यक आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांच्याकडे अध्यक्षपद नसावे, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसावा, ही निवड करताना सक्षम महिला, अनुसूचीत जाती, जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले आहे.

BJP District President : नांदेड ग्रामीणला उसना जिल्हाध्यक्ष का दिला जातो?

भाजपाच्या मंडळ आणि तालुका स्तरावरील १२ तालुक्यांच्या समित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये यवतमाळ शहर, बोरी अरब ग्रामीण, यवतमाळ ग्रामीण, राळेगाव शहर आणि ग्रामीण, आर्णी ग्रामीण, बाभूळगाव शहर, ग्रामीण, कळंब शहर, ग्रामीण, मोहदा सर्कल, केळापूर ग्रामणी, पांढरकवडा शहर, घाटंजी शहर आणि ग्रामीण समित्यांचा यात समावेश आहे.

भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया एप्रिलअखेरीस अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रदेश कमिटी कुणाचे नाव सुचविये याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हाध्यक्षांची निवड पक्षश्रेष्ठी करणार आहेत.