Chandrashekhar Bawankule : विकास कामांसाठी वेळ मिळत नाहीये, आम्ही कशाला धमक्या देऊ ?

Chandrashekhar Bawankule’s restrained response to Uddhav Thackeray’s allegations : त्यांच्या कर्तृत्वाने ते मोक्कात गेले तर आम्ही काय कराव ?

Nagpur : काँग्रेसच्या काळात शिवसैनिकांना पोलिसांकरवी धमक्या दिल्या जायच्या. ‘आमच्या पक्षात ये, नाही तर टाडा लावतो..’, अशा त्या धमक्या असायच्या. आजही तेच चाललंय. पोलिसांचा वापर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी केला जातोय. पोलिस हे शस्त्र आहे, त्यांचा वापर कुणी कसा करायचा, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. पण आज पोलिसांचा गैरवापर केला जात आहे, असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर ‘आम्हाला विकास कामं करण्यासाठी वेळ मिळत नाहिये, आम्ही कशाला कुणाला धमक्या देऊ’, असा प्रतिप्रश्न राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (१९ एप्रिल) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ठाकरे खोटे बोलतात, त्यांच्या पक्षाचे अवसान गळाले आहे. पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणूणच स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज एआयचा वापर करून लोकांना ऐकवावा लागतो आहे. येवढी वाईट त्यांची परीस्थिती झाली आहे. अशा लोकांना आम्ही कशाला धमक्या देऊ? आम्हाला आमची कामं आहेत. फालतू कामांसाठी आमच्याकडे वेळ नाही. त्यांच्या कर्तृत्वाने ते टाडा, मोक्कात गेले, त्याला आम्ही काय करणार?

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे हिंदीसाठी राज ठाकरेंना करणार विनंती !

गांधी परिवाराच्या हेरॉल़्ड प्रकरणाबाबत विचारले असता, त्या प्रकरणाची चौकशी झाली. चौकशीत काही आढळलं नाही, तर ते सुटणार. त्यांना कुठून काही धमक्या आल्या असतील तर त्यात आमचा काही दोष नाही. त्यांनी पोलिसांकडे गेले पाहिजे, तक्रार दिली पाहिजे. आमच्या आरोप करण्यात काही अर्थ नाही. याबाबतीत त्यांनी विनाकारण राजकारण करू नये, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.

Neelam Gorhe : ‘शिवसेना शिंदे गट’ नव्हे, शिवसेना आपलीच !

वाडे, धनगर पाडे या सर्व ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून नळाच्या योजना दिल्या. पण लहान – लहान पाड्यांवर पोहोचणे यंत्रणेला अजूनही शक्य झाले नाही. अशा योजना पूर्ण करण्यासाठी वेळ लागतोच. थोडा वेळ झाला, हे कबूल आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी दुर्घटना व्हावी, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही. सरकार यामध्ये लक्ष घालेल. पाणी पुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अपूर्ण योजना पूर्ण करण्यात येतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.