Chandrashekhar Bawankule slaps two officials in Pune : गुन्हा दाखल, जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी मागितली होती ५० लाखांची लाच
Nagpur : भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखला जाणारा महसूल विभाग भ्रष्टाचार मुक्त होईल का, असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. महायुतीच्या सरकारमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाया होण्याची संख्या वाढताना दिसत आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी पुण्यातील दोन अधिकाऱ्यांना दणका दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील भूअभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी, मोजणी करण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. याची तक्रार महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेतली आणि चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. गंभीर आरोप असलेले उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधीक्षक किरण येटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chandrashekhar Bawankule : विकास कामांसाठी वेळ मिळत नाहीये, आम्ही कशाला धमक्या देऊ ?
पिडीताने दिलेल्या तक्रारीनुसार, २००३पासून पुणे ग्रामीणमधील एका शेतजमिनीची मोजणी आणि हद्द निर्धारीत करण्याची प्रक्रिया प्रलंबीत होती. तक्रारदाराने यासाठी सातत्याने अर्ज केले, पत्रव्यवहार केला. पण अमरसिंह पाटील आणि किरण येटोळे टाळाटाळ करत होते. तक्रारदार त्यांच्या कार्यालयाच्या चकरा मारून मारून त्रस्त झाला होता. दरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतजमिनीची मोजणी आणि हद्द निर्धारीत करून देण्यासाठी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे हिंदीसाठी राज ठाकरेंना करणार विनंती !
मागणी पूर्ण केली नाही तर ‘हेलिकॉप्टर शॉट लावतो’, अशीही धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पुणे शहर आर्थिक व सायबर गुन्हे शाकेने प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारदाराने थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती, त्याची तात्काळ दखल घेण्यात आली.