The MLA locked the insurance company officials in the room : जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर प्रश्न सुटला
Akola MLA Harish Pimple शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पिक विम्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शासकीय क्षमता खोलीत डांबून ठेवले. ते स्वतःही त्या खोलीत उपस्थित होते. त्यानंतर आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. पण या घटनेमुळे विमा कंपनीचे अधिकारी चांगलेच धास्तावले होते.
पीक विम्याच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृहात ६ जानेवारीला चर्चेसाठी बोलावले. कुरूम मंडळातील ५४३ शेतकऱ्यांना खरीप २०२३-२०२४ मधील सोयाबीनच्या पीक विमा लाभापासून विमा कंपनीने वंचित ठेवले, असा आरोप आहे. पीक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याची तक्रार होती. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार पिंपळे यांच्याकडे ही तक्रार केली होती.
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार पिंपळे संतप्त झाले. त्यांनी पीक विमा कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन केले. यावेळी पीक विमा कंपनीचे अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक सुनील भालेराव, शेख शकील, जिल्हा प्रतिनिधी सुजय निपाने, तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल गव्हाणे, शुभम हरणे हे पाच जण मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित होते.
ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याकरिता यातना सोसाव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनाही जाण व्हावी, या उद्देशाने पीक विमा कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना एका खोलीत तब्बल पाच तास डांबून ठेवले. अखेर पाच तासांनंतर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मध्यस्थी केली. तसेच वंचित शेतकऱ्यांना येत्या आठवड्यातच पीक विमा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विमा अधिकारी व प्रतिनिधींना सोडण्यात आले.
The wait for Somalwada RUB is over : नागरिकांनी केले अंडरपासचे ‘उद्घाटन’ !
अधिकाऱ्यांची दिशाभूल
खरीप २०२३-२४ मधील सोयाबीन पिकाला केंद्र व राज्य शासनाने पीक विमा नुकसान भरपाई म्हणून रकमेचा हप्ता दिला आहे. मात्र, विमा कंपनीचे कर्मचारी शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. कुरुम मंडळातील ५४३ शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा विमा मिळत नाही. अद्यापही विमा दिला नाही, म्हणून त्यांना डांबले होते, असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची रक्कम खात्यात जमा झाली नाही
शासकीय विश्रामगृहामध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता कुरुम मंडळातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात आमदारांसोबत बैठक आयोजित केली होती. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम ही पोर्टलवर दिसत आहे. मात्र त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. लवकरच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. त्यापूर्वीच चर्चेदरम्यान आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पाच तास शासकीय विश्रामगृहातील खोलीत आम्हाला डांबून ठेवले होते. असे विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रफुल्ल गव्हाणे त्यांनी सांगितले.