ED is being used to cover up the government’s failures : सोनिया-राहुल गांधींविरोधात सुडबुद्धीने आरोपपत्र, काँग्रेस प्रवक्त्याचा आरोप
Akola केंद्रातील भाजप सरकार मनमानी व अत्याचारी कारभार करीत असून, विरोधकांना संपवण्याचे काम करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना धमकावले जात आहे. अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) वापर फक्त विरोधी नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला.
ईडीने गेल्या पाच वर्षांत १९३ राजकीय नेत्यांविरोधात प्रकरणे दाखल केली असून, त्यापैकी केवळ दोन प्रकरणांत शिक्षा झाली आहे, अशी माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिल्याचे डॉ. ढोणे यांनी नमूद केले. यावरूनच ईडीचा वापर राजकीय हेतूने होत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.
Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!
अमेरिकेने भारतावर लादलेले कर, चीनने बळकावलेला भूभाग, बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार, तसेच देशातील महागाई, वाढते इंधनदर, बेरोजगारी यामुळे निर्माण झालेला असंतोष लपवण्यासाठीच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले, असा आरोप डॉ. ढोणे यांनी केला.
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात कोणताही गैरव्यवहार नाही
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवाई आदींनी १९३७ मध्ये ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र सुरू केले होते. या वृत्तपत्राच्या ‘असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड’ या कंपनीला काँग्रेसने २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या पैकी ६७ कोटी कर्मचाऱ्यांचे वेतन, विजबिल, भाडे आदी खर्चासाठी वापरण्यात आले.
निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबर २०१२ रोजी स्पष्ट केले होते की राजकीय पक्षाने कंपनीला दिलेले कर्ज हा ना गुन्हा आहे ना तो बेकायदेशीर.
NCP Ajit Pawar Politics : तटकरेंना अॅलर्जी ‘संग्राम’ नावाची की मराठ्यांची ?
संचालकांना कोणताही आर्थिक लाभ नाही
वृत्तपत्राचा तोटा वाढल्यामुळे ‘असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड’ने आपली मालमत्ता ‘यंग इंडिया’ या नॉन-प्रॉफिट कंपनीला हस्तांतरित केली. या कंपनीचे संचालक सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरा व सुमन दुबे यांना कोणताही नफा, वेतन, लाभांश मिळत नाही. त्यामुळे गैरव्यवहाराचा आरोप हास्यास्पद असून, हे प्रकरण केवळ राजकीय द्वेषातून उभे करण्यात आल्याचा आरोप डॉ. ढोणे यांनी केला.
भाजपकडून या प्रकरणात ५ हजार कोटी आणि २ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत असले तरी, त्याला कोणताही पुरावा नाही. भाजपाची ‘खोटं बोला पण रेटून बोला’ ही पद्धत आता जनतेच्या लक्षात आली आहे, असेही डॉ. ढोणे म्हणाले.\