Prataprao Jadhav : नख गळतीच्या आजाराने केंद्रीय पथकही बुचकाळ्यात!

The central team is also Confused due to nail loss disease : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे नियंत्रणासाठी निर्देश

Buldhana जिल्ह्यातील काही गावांमध्ये केस गळतीचे आणि त्यानंतर नख गळतीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारच्या पथकाला या आजाराच्या मुळाशी जाऊन कारणं शोधण्याचे निर्देश दिले. केस व नख गळतीच्या पश्वभूमीवर मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

यावेळी आयसीएमआर, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीचे डरमेटोलॉजी तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते आदी उपस्थित होते.

Dr. Pankaj Bhoyar : जंगलाने वेढलं, सरकारने सोडवलं!

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, रुग्णांना पुन्हा त्रास होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच या आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करा. यासाठी रुग्णांचे रक्ताचे नमुने तसेच बाधित गावातील पाणी, माती, धान्य आदींचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे सूचना दिल्या.

केंद्रीय पथक दोन दिवस बांधीत गावाला भेटी देणार असून रुग्णांशी भेटी घेऊन आजाराचे मूळ कारण शोधणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केंद्रीय पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रताप जाधव यांनी यावेळी केले. बुलडाणा जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

Local Body Elections : मंडळ अध्यक्ष नव्हे, निवडणुका जिंकण्याची सोय!

या प्रकरणाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या नऊ विभागांचे तज्ज्ञ आज जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तज्ज्ञांकडून आता गावागावात जाऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत प्रत्यक्ष माहिती संकलन केले जाईल. यावरूनच या आजाराचा खरा स्रोत आणि त्यावरील उपाय निश्चित केले जातील.