Breaking

Nail loss disease : बुलढाण्यातील १३ गावांमध्ये गळताहेत नख!

13 villeges suffering from nail loss : नव्या आजाराने नागरिक भयभीत; केंद्रीय पथकाची बोंडगावात तपासणी

Buldhana शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण १३ गावांमध्ये केस व नख गळतीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेवरून हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. गावोगावी जाऊन तपासणी मोहीम राबवत आहे. पण या नव्या आजाराचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील बोंडगाव आणि आसपासच्या गावांमध्ये केस व नख गळतीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय तज्ज्ञ पथकाने मंगळवारी (२२ एप्रिल) बोंडगावला भेट देऊन रुग्णांची तपासणी केली. पथकाने रुग्णांशी थेट संवाद साधत प्रकृतीविषयी माहिती घेतली तसेच विविध नैसर्गिक व रासायनिक नमुने संकलित केले.

Encroachment removal campaign : व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, नाहीतर न्यायालयात खेचू

या पथकात ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), जल जीवन मिशन, FSSAI, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज (दिल्ली), भारतीय गहू व जव संशोधन संस्था (हरियाणा), प्लांट क्वारंटाईन विभाग, तसेच कृषी मंत्रालयातील तज्ज्ञांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हेही उपस्थित होते.

Water crisis in Buldhana : बुलढाण्यातील भीषण वास्तव; १९ गावे तहानलेली, ७ गावे टँकरवर!

नखं कुठे नेत आहात?

“आधी केस, आता नखं… पुढे काय होणार?” – असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. केसगळतीच्या समस्येने बाधित रुग्णांसह गावकरी त्रस्त आहेत. त्यातच नखगळतीची समस्या सुरू झाली. आयसीएमआरचा अहवाल अद्याप आला नाही. रुग्णांचे रक्त, केस, नखांचे नमुने गोळा करून नेता तरी कुठे ? असा संतप्त सवाल बोंडगावच्या ग्रामस्थांनी पुण्याच्या आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबीता कमलापूरकर यांच्यासमोर केला होता.