Breaking

Jammu – Kashmir Attack : भय तिथले संपले नाही..!

 

Tourists in Jammu and Kashmir are safe, but the fear is not over there : पर्यटनाच्या आनंदावर विरजण, सर्वच परतीच्या प्रयत्नांत

Nagpur : मंगळवारी जम्मू – काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला. हल्ला झाला त्यावेळी काही पर्यंटक पहलगाममध्येच होते. तर काही पर्यटक पहलगामच्या दिशेने निघाले होते. हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्वांना माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे मार्गस्थ असलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर भय होते.

दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटनाच्या आनंदावर विरजण तर पडलेच पण भीतीही निर्माण झाली. नागपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पराग नगराळे कुटुंबीयांसह पर्यटनासाठी गेले होते. पहहगाम येथे पोहचण्यासाठी फक्त १० किलोमीटर अंतर पार करायचे राहिले होते. तेव्हा रस्त्यावर सुरक्षा दलाचे जवान, पोलिस आणि वाहनांची गर्दी होती. तेव्हाच हा हल्ला झाला आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी नगराळे कुंटुंबीयांना माघारी फिरण्यास सांगितले.

Jammu – Kashmir Attack : नागपुरातील दोनशेवर पर्यटक अद्यापही अडकून, पण सुरक्षीत !

आधी पहलगामला पोहोचलो असतो तर.. या विचाराने आताही नगराळे कुटुंबीयांच्या अंगावर काटा येतो आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी धीर देऊन परत पाठवले. त्यानंतर आम्ही लगेच माघारी फिरलो आणि भीतीपोटी पर्यटन सोडून परतीच्या प्रवासाला निघालो आहोत, असे पराग नगराळे यांनी सांगितले. कर्फ्यू असल्याने सर्व रस्ते सुनसान होते. सायंकाळी विमानतळाच्या दिशेने सर्व पर्यटकांनी धाव घेतली. सगळ्यांना परत जाण्याची घाई झाली होती. आताही पर्यटक मिळेल त्या साधनाने परत जाण्याच्या प्रयत्नांत आहेत.

Pehalgam terrorist attack : बुलडाण्यातील पाच जण पहेलगाममध्ये अडकले!

 

 

सगळेच पर्यटक एकाच वेळी परतीच्या प्रवासाला निघाल्याने रस्ते जाम झाले होते. श्रीनगर विमानतळावर लोकांची एकच गर्दी उसळली होती. पर्यटनाच्या आनंदाचा तर हिरमोड झालाच. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भय दिसत होते. प्रत्येकाला घरी जाण्याची घाई होती. घटना ज्यांनी बघितली, ते लोक चक्कर येऊन कोसळले. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी तिथले भय संपलेले नाही, असेही पराग नगराळे यांनी सांगितले.