80 Deputy Collectors became Additional Collectors : विदर्भ व मराठवाड्यातील रिक्त पदे भरली
Mumbai : महसूल विभागामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक रिक्त पदे होती. नुकत्याच काढण्यात आलेल्या शासन आदेशानुसार राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. यामुळे रिक्त पदे भरली गेली. यानंतर तहसीलदारपदाचीही निवडयादी लवकरच जाहिर केली जाणार आहे.
एक ते दीड महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात ६० अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी देण्यात आली. यामध्ये ३४ अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याच्या कामाला गती मिळाली आहे. सरकारच्या शंभर दिवसांच्या धडक कृती कार्यक्रमाचे हे फलीत असल्याचे सांगितले जात आहे.
काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहात होते. नुकत्याच केलेल्या पदोन्नतीमुळे हा प्रकार आता बंद होणार आहे. अनेक वर्षे दुर्गम भागांत राहिलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये बदल्या देण्यात आल्या आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची पदे भरली गेल्यामुळे महसूल विभागातील जिल्हास्तरांवरील सुनावण्यांची गती वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Terroirist attack in Pahalgam : दहशतवादाचा कायमचा बिमोड व्हावा
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिल्यामुळे उपजिल्हाधिकारी वर्गामध्ये कारभार थंड पडला होता. या पदोन्नती आणि बदल्या पारदर्शकपणे करण्यात आल्या आहेत. या वर्गात आता समाधानाचे वातावरण असून कामाची गती वाढणार आहे. महसूल विभागात गेल्या १५ ते २० वर्षांपासून उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली नव्हती. आता पदोन्नतीसह बदल्या झाल्यामुळे महसूल विभागात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.