Breaking

Sanjay Nirupam : मराठी बाणा विदेशात फोटोग्राफीत मग्न !

Sanjay Nirupam’s harsh criticism on Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एकनाथ शिंदे धाऊन गेले

Mumbai : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे महाराष्ट्रातील पर्यटक अडकून पडले असताना नेहमी ‘मराठी बाणा’च्या बाता करणारे उद्धव ठाकरे आता कुठे आहेत, तर विदेशात. तेथे कुटुंबीयांसह ते सुट्यांचा आनंद घेत फोटोग्राफी करत आहेत. अशा संकटाच्या वेळी त्यांना महाराष्ट्रातील पर्यटकांची मदत करावीशी वाटली नाही का, असा तिखट सवाल शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला आहे.

मराठी भाषीकांचे ढोंगी कैवारी, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर संजय निरुपम यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले, उबाठाने महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत कोणतीही संवेदना व्यक्त केली नाही. येवढेच काय तर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडेही उबाठाने पाठ फिरवली. महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत संवेदना व्यक्त करायलाही त्यांना वेळ मिळाला नाही. पण महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एकनाथ शिंदे धाऊन गेले.

Sanjay Nirupam : संजय राऊत यांनी शिवसेना संपवली

अजूनही काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील २००० च्या जवळपास पर्यटक थांबलेले आहेत. शिवसेनेकडून स्टार एअरलाईन्स आणि अकासा एअरलाईन्सकडून प्रत्येकी दोन – दोन फेऱ्या झाल्या आहेत. यातून ५२० पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यात आलेले आहे. महायुती सरकारकडून पर्यटकांना परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यटकांची भीती दूर करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरला गेले. पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. पण त्यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांची नीच वृत्ती दिसून आली, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनाही टोला लगावला.

Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास जाणे !

केंद्र सरकारने सिंधू कराराला स्थगीती देऊन पाकिस्तानचे पाणी रोखले. पाकिस्तानशी संबंध तोडून टाकले. याचा आनंद आहेच. पण केंद्र सरकारने पाकिस्तानच्या विरोधात लष्करी कारवाई करावी. तेथील दहशदवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करावे. ज्यांनी कुणी तेथे दहशतवाद्यांना थारा दिला असेल, त्या प्रत्येकावर कारवाई करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.