Sudhir Mungantiwar’s efforts to provide new houses to encroachers : नवीन रेल्वे लाईन जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण
Chandrapur : चंद्रपूर शहरातील सावरकर नगर, रयतवारी, लखमापूर आणि रेल्वे स्टेशन यार्ड या परिसरांतील रेल्वेच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून मजूर येथे राहात आहेत. तर काहींनी पक्की घरे उभारली आहेत. आता रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. पण या मजुरांना बेघर करू नये, त्यांची घरे हिरावली जाऊ नये, अशी भूमिका राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे कामही आवश्यक आहे. तर दुसरीकडे २५ वर्षांपासून राहात असलेले मजुरही बेघर होता कामा नये, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी मध्यम मार्ग काढला. या सर्व मजुरांना नवी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ते सरसावले आहेत. यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली, पत्रही पाठवले आणि त्यांना यासंदर्भात मुंबई बैठक लावण्याची मागणी केली.
Sudhir Mungantiwar : इरई नदीसाठी पालकमंत्री उईके आणि मुनगंटीवारांनी दिला आपला पगार !
आमदार मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्षव यांच्यात झालेल्या चर्चेनुसार रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये २५ वर्षांपासून राहात असलेल्या लोकांचा निवारा हिरावला जाऊ नये, यादृष्टीने निर्णय घेतला गेला पाहिजे, अशी विनंती आमदार मुनगंटीवार यांनी केली. त्याला धर्मवीर मीना यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अतिक्रमणधारक नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत आपण संवेदनशील असून लवकरच योग्य निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यामुळे आता अतिक्रमित ९०० घरे हटवल्यावरही लोकांना बेघर व्हावे लागणार नाही.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् मूल बसस्थानकावर उपलब्ध झाले शुद्ध, थंड पाणी !
मुंबईत झालेल्या बैठकीत रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्मवीर मीना, डॉ. मंगेश गुलवाडे, अजय दुबे, अनिल डोंगरे, अमित निरंजने, राकेश बोमनवार, होमेश्र्वर नंदनवार, महेश झिटे, सुभान पठाण, सुरेंद्र मंचलवार, जिल्हाधिकारी, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी झुमद्वारे उपस्थित होते.