BJP leader interacts with tribal brothers : भाजप नेत्यांनी साधला गोंधळवाडीतील आदिवासी भगिनींशी थेट संवाद
akola भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी गोंधळवाडी येथील शंभर टक्के आदिवासी वस्तीला भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेत आत्मीयतेने संवाद साधला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजापर्यंत पोहोचतो आहे का, याची प्रत्यक्ष तपासणी करत त्यांनी अडचणी सोडवण्याची ग्वाही दिली.
रवींद्र चव्हाण अकोला जिल्ह्यात नऊ जिल्ह्यांच्या संघटनात्मक आढावा बैठकीसाठी आले होते. याच दरम्यान त्यांनी पातुर तालुक्यातील गोंधळवाडी गावाला भेट दिली. त्यांच्या समवेत खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकरही उपस्थित होते. गावात ‘मातृशक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलांच्या भेटी घेऊन त्यांनी त्यांच्या रोजगाराच्या अडचणी समजून घेतल्या.
Navneet Rana : हिंदुस्थानावर डोळे वटाराल, तर डोळेच काढून घेऊ
गावातील महिलांकडून बीबे फोडणीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यास रोजगाराच्या संधी वाढू शकतात, असे निरीक्षण चव्हाण यांनी नोंदवले. यासाठी शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, श्रावण बाळ योजना, लाडकी बहिण योजना यांची माहिती देऊन, लाभ मिळाला आहे का याचीही चौकशी केली.
World Audio Visual Entertainment summit: महाराष्ट्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत !
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, विद्यार्थी परिषद व स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार समाजाच्या विकासासाठी कार्य केले आहे. याच अनुभवाच्या बळावर ते सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध आहेत, हे कृतीतून सिद्ध केले.
Water Conservation Department : गुगलसोबत होणार जलसंधारणाच्या कामांची पाहणी !
चव्हाण यांनी गावातील नलिनी संतोष देवकर, कविता उल्हास भोकरे, रेखा अरविंद करवते यांच्या घरी जाऊन त्यांच्या वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या. कोणताही मोठा गाजावाजा न करता, साधेपणाने संवाद साधत त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास जिंकला. ४ जूनला पुन्हा गोंधळवाडीला भेट देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.