Aspirants focus on meetings in the backdrop of elections : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचा गाठीभेटींवर भर
Amravati महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता, अमरावती शहरासह ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. तसेच स्वतःची उपस्थिती प्रभावीपणे जाणवू देत आहेत.
अमरावती जिल्ह्यात प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे बबलू देशमुख, यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्या भोवती राजकारण फिरत असल्याने यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. तीन वर्षांपूर्वी महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर निवडणुका अपेक्षित असताना, लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमामुळे त्या पुढे ढकलल्या गेल्या.
Chandrashekhar Bawankule : शासनावरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न
त्यानंतर चार महिन्यांपूर्वीच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि राज्यात महायुतीला भक्कम बहुमत मिळाले. त्यानंतर मे महिन्यात जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र आरक्षणाच्या गोंधळामुळे निवडणुका पुन्हा लांबल्या.
सध्या दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुका होणार की थांबविल्या जाणार, यावर अजूनही सुस्पष्टता नाही. तरीही कोणतीही घोषणा न झालेली असताना संभाव्य उमेदवारांनी सज्जता सुरू केली आहे. तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी तसेच नव्या इच्छुक कार्यकर्त्यांनी वाढदिवस, साखरपुडे, लग्न समारंभ, मृत्यूपत्रिकांचे कार्यक्रम, तेरवी यांसारख्या सामाजिक प्रसंगांचा उपयोग करून मतदारांशी संबंध वृद्धिंगत करण्यास सुरुवात केली आहे.
MLA Randhir Sawarkar : वडेट्टीवारांचे वक्तव्य म्हणजे देशविरोधी मानसिकतेचा कळस
त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांनी नुकत्याच केलेल्या संघटनात्मक नियुक्त्यांमुळेही अनेक कार्यकर्त्यांना नवी जबाबदारी मिळाल्याने निवडणुकीसाठी त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, या अपेक्षेने इच्छुकांचा जनसंपर्क मोहिमेला वेग आला आहे.