Breaking

Water shortage :आमदार मुनगंटीवारांची सुचना अन् १५ गावांचा पाणीप्रश्न मिटला !

 

MLA Sudhir Mungantiwar’s suggestion and the water problem of 15 villages solved : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कार्यान्वीत केली योजना

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावे दरवर्षी पाणी टंचाईचे चटके सहन करत होती. पोंभुर्ण्याचे माजी सभापती विनोद देशमुख यांनी ही समस्या राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली. त्यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन पोंभूर्णा पॉवर ग्रीड योजना सुरू करण्याचे निर्देश दिले.

आमदार मुनगंटीवार यांची तत्परता आणि पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांना आता पाणी टंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत. ग्रीड पाणी पुरवठा योजनेतून त्यांची समस्या निकाली निघाली आहे. १ जून २०२२ ला १५ गावांची पोंभूर्णा ग्रीड योजना कार्यान्वीत करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये अडचणी आल्या.

Clean, beautiful city : स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षीत शहर हीच खरी सेवा !

१५ गावांपैकी ८ गावांना पाणी पुरवठा नियमित होत नव्हता. त्यामुळे योजना हस्तांतरीत होऊ शकली नाही. दुसरीकडे मजीप्राकडे वीज देयक भरण्यासाठी निधी नव्हता. परिणामी ही योजना डिसेंबर २०२४मध्ये बंद पडली आणि पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली. पाणी टंचाईची स्थिती बघून आमदार मुनगंटीवार यांनी ५ एप्रिलला आढावा सभा घेतली आणि ही योजना तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिली “माझे आरोग्य माझ्या हाती” उपक्रमाला गती

आमदार मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर चंद्रपूर जिल्हा परषदेने २५ एप्रिल २०२५ रोजी पोंभूर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज देयकाच्या ५.७१ लाख रुपयांचा भरणा केला. आता योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. त्याबद्दल १५ गावांतील नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. चक ठाणेवासना, नवेगाव मोरे, चक नवेगाव, मोहाडा रै, वेळवा, सेलू नागारेडी, चक कोसंबी, देवाडा खुर्द, जाम तु., रामपूर दीक्षित, बोर्डा दीक्षित, कसरगट्टा, चक घनोटी १, जाम खु. या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.