Gowari will now enter the mainstream due to the efforts of MLA Dr. Parinay Phuke : आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यान्वित
Nagpur : गोवारी हा आदिवासी समाजाचा एक भाग आहे. या समाजाचे मुख्य काम गायी राखणे असते. ते गोंड – गोवारी आहेत, असा त्यांचा समज आहे. खासकरून हा समाज विदर्भातच मोठ्या प्रमाणात आहे. हळूहळू या समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गोवारी समाजाचा आवाज बुलंद केला.
गोवारी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार डॉ. फुके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शासन दरबारी गोवारींच्या समस्या मांडल्या. शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या आग्रही मागण्या पूर्ण करवून घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून शिकणे सोयीचे व्हावे म्हणून राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत विभागीय, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर शासकीय वसतिगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
Guardian Ministership controversy : अमित शाह येऊनसुद्धा पालकमंत्रिपदाचा वाद मिटला नाही !
आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोबतच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गोवारी समाजातील हजारो विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष लाक्ष होणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोवारी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचेही ते म्हणाले.
ED office fire : ईडी कार्यालयाच्या आगीत जळालेल्या फाईल्सचे बॅक अप आहे का ?
विद्यार्थीच नव्हे तर बेरोजगार तरुणांसाठी आर्थिक सहाय्य आणि महिलांसाठी स्वयंरोजगार व उद्योजकतेला वाव देणाऱ्या उपक्रमांचाही समावेश या नव्या कार्यक्रमात असणार आहे. या योजनेनुसार अनुसूचित जमातीप्रमाणेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश, निवास, आहार आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. सोबतच शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थांसाठी प्रोत्साहनपर बक्षीसे अशा योजनाही राबवल्या जाणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.