Opposition conducting Janata Darbar in Amravati : अमरावती जिल्हाध्यक्षांनी केले आवाहन; खासदार, आमदारांची राहणार उपस्थिती
Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. पण सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. कुणी ट्रॅक्टर मोर्चा काढतय, कुणी सद्भावना यात्रा, तर कुणी कलश यात्रा. सत्ताधारी भाजप जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा जल्लोष करतय. अशात काँग्रेसने जनता दरबारची मात्रा शोधली आहे. अमरावती जिल्हाध्यक्षांनी नागरिकांना त्यांच्या समस्या घेऊन दरबारात येण्याचे आवाहन केले आहे.
शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा दरबार सोमवार, ५ मे रोजी दुपारी १ वाजता काँग्रेस भवन येथे पार पडणार आहे.
Farmer’s agitation : वारे विदर्भाच्या पोरा.. सातबारा कोरा.. तुझा खोटा रे नारा..!
या जनता दरबारात खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी मंत्री सुनील देशमुख, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी, गरीब, महिला, युवती, बेरोजगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासन दरबारी दुर्लक्षित राहतात. या समस्यांवर ठोस तोडगा निघावा यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून या समस्या मांडता येणार आहेत.
जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले की, “नागरिकांनी आपल्या व्यक्तिगत तसेच सामूहिक समस्या या दरबारात मांडाव्यात. त्यावर तातडीने स्थानिक पातळीवर उपाययोजना केली जाणार आहे. काही प्रकरणांवर खासदार बळवंत वानखडे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.”