Breaking

Nitin Gadkari : कठोर भाषेत बोलले, पण मनाला जखम होऊ दिली नाही!

Memories of Yogananda Kale remembered at the tribute meeting : योगानंद काळेंच्या आठवणींना गडकरींनी दिला उजाळा

Nagpur स्व. योगानंद काळे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपले. त्यांना कधी कठोर व्हावे लागले. कठोर शब्दांत बोलावे लागले. पण तरीही आपल्या बोलण्यातून कुणाच्या मनाला जखम होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर शाखेच्या वतीने लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई लॉन येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी गडकरी बोलत होते.

Bhartiya Seva Sadan : भारतीय सेवा सदन विश्वस्त मंडळ निवडणूक वादात

निःस्पृह, निःस्वार्थ कार्य करताना योगानंद काळे यांनी स्वतःसाठी कधीही काही मागितले नाही. त्यांचे व्यक्तित्व शालीन आणि नम्र होते. कार्यकर्त्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. संघटना आणि विचारांबद्दल त्यांची कटिबद्धता होती. त्यांच्या सहवासात कार्यकर्त्यांना आपली सुख-दुःख मांडण्याची मोकळीक होती. त्यामुळे त्यांचे जाणे सर्वांसाठी एक मोठा आघात आहे.’

त्यांनी ज्या काळात पक्ष संघटनेचे काम केले, तो कठीण काळ होता. त्या काळात मान, सन्मान, प्रतिष्ठा नव्हती. सुमतीताई सुकळीकर यांना आपण निवडणूक जिंकवून देऊ शकलो नाही, याचे शल्य त्यांच्या मनात होते. आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, अशी उत्कट भावना त्यांच्या मनात होती. १९९५ च्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. त्यानंतर नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषदेत सत्ता होती. सर्व आमदार आपल्या पक्षाचे होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Amravati Congress : आता काँग्रेसचाही जनता दरबार!

स्व. योगानंद काळे हे प्रतिकुल काळात पक्षासाठी कार्य करणारा शेवटचा दुवा होते. आता बोटावर मोजण्याएवढे लोक उरले आहेत. कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून दिशा देणाऱ्या दीपस्तंभासारखे ते उभे होते. त्यांची पोकळी भरून काढणारे असंख्य कार्यकर्ते तयार झाले तर, तीच त्यांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असेही गडकरी म्हणाले.