Breaking

Castbase census: जातीनिहाय जनगणना; भाजपपाठोपाठ काँग्रेसचाही जल्लोष

Congress welcomed the government’s descision : चांदूरबाजार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निर्णयाचे स्वागत

Amravati लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दीर्घकाळापासून मागणी करत असलेल्या जातनिहाय जनगणनेची केंद्र सरकारकडून अखेर घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचे चांदूरबाजार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर चांदूरबाजार येथील काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात जल्लोष साजरा करण्यात आला. “बहुजनांची जिंक” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nitin Gadkari : कठोर भाषेत बोलले, पण मनाला जखम होऊ दिली नाही!

कार्यक्रमात किशोर देशमुख, प्रा. प्रताप कितुकले, हरिभाऊ बोडे, राजाभाऊ चेक, अशफाकभाई पठाण, शिवाजी काळे, अवधूत मातरे, मनीष डाखोरे, मनोज देशमुख, छोटू देशमुख, मनीष मांडवकर, विजय राऊत, प्रीतम नानापुरे, अमित इंगोले, योगेश विधे, निलेश डांगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दर्यापूरातही काँग्रेसचा आनंदोत्सव
“ज्यांची संख्या जास्त, त्यांना जास्त हिस्सा” या तत्त्वानुसार काँग्रेसने जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. केंद्र सरकारने ही मागणी मान्य करताच दर्यापूरमध्ये काँग्रेसतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Illegal liquor sale : अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिलांचा एल्गार!

बसस्थानक परिसरात झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हा महासचिव रुलाय बेलोकर, गजानन तळे, प्रभाकर गाढी, अ‍ॅड. निशिकांत पाखरे, राजेश खेडकर, अमोल गाठील, प्रकाश कक्षाण, अमोल आधा, विनोद तेलरांधे, रमेश पोरे, दिनेश तांबडे, डॉ. ओमनाथ सुर्यवंशी, नितीन लोणकर, मनीष मोटारी, प्रेमवासो काळे आदी उपस्थित होते.