Ammol Walke’s desire to do meaningful work for the disabled : जडीबुटीच्या औषधोपचाराने दुरूस्त झाला एक पाय, दुसरा निकामीच
Nagpur : प्रबळ इच्छाशक्ती असली की अवघडातील अवघड ध्येयसुद्धा साध्य करता येतं. निसर्गाने माणसात काही उणीव ठेवली तरीही आकाशाला गवसणी घालता येते. हे सिद्ध केलंय अम्मोल वाळके नावाच्या तरुणानं. निसर्गानं लादलेल्या दिव्यंगत्वावर मात करत खेळ, व्यवसाय, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांत सक्रीय राहून तो दिव्यांगांसाठी कार्य करतो आहे.
२००० साली अम्मोल शिकण्यासाठी नागपुरात आला होता. त्यानंतर येथेच स्थायीक झाला. त्याला पोलिओ झाला होता. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. जडीबुटीच्या औषधोपचाराने त्याचा एक पाय दुरूस्त झाला. पण एक पाय अजूनही पूर्णपणे निकामी आहे. तरीही आर्म रेसलींगमध्ये तो अव्वल आहे. यासोबत त्याने व्यवसायातही भरारी घेतली. आज तो चार – चार कंपन्यांचा मालक आहे. यासोबत समाजकारण आणि राजकारणातही तो सक्रीय आहे. राजकारण, समाजकारण तो दिव्यांग बांधवांसाठी करतोय.
Political Leaders : पुढाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर करावी !
‘मी स्वतः दिवायंग आहे त्यामुळे दिव्यांगांना काय काय समस्या भेडसावतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे माझ्या बांधवांसाठी भरपूर काम करायचे आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. यासाठी मोठी सपोर्ट सिस्टीम लागते. त्यामुळेच मी खेळ, व्यवसाय यांसोबत समाजकारण आणि राजकारणाची वाट धरली. या क्षेत्रांत राहून दिव्यांगासाठी काही करू शकत आहो.
विदर्भासह महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याचे काम सुरू आहे. नागपुरातील लवकुश नगर कार्यालयातून दिव्यांगाचे काम चालवतो. तेथे पूर्णवेळ तीन कर्मचारी नियुक्त केले आहेत. तेसुद्धा दिव्यांग आहे. त्यामुळे आलेल्या लोकांची कामे ते जिव्हाळ्यानं करतात. लांबून लांबून दिव्यांग बांधव येतात.संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांची कामे करतो. यासाठी समाजकारण आणि राजकारणातील सहभाग खूप कामी येतो.’, असे अम्मोल वाळके यांनी ‘सत्तावेध’शी बोलताना सांगितले.
Congress Leader : पहिले देशातच पप्पू म्हणायचे, आता देशाबाहेरही पप्पू म्हणतात !
आर्म रेसलींग चॅम्पीयनशीमध्ये अम्मोलला सुवर्ण पदकांसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सुवर्ण पदक मिळालेले आहे. सध्याही तो ३ ते १२ मे दरम्यान दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेत २५ देशांतील खेळाडू सहभागी झालेले आहेत. यामध्येही सुवर्णपदक मिळवण्याची अम्मोलची जिद्द आहे. याही स्पर्धेत यश मिळवीनच, असा विश्वास त्याने व्यक्त केला.