Mahayuti won the most seats : १६ पैकी १० जागांवर बाजी, महाविकास आघाडीसोबत होती थेट लढत
Buldhana नांदुरा तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था (खविस) मर्यादित नांदुरा यांच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने १६ पैकी १० जागा जिंकत बहुमत मिळवले. ही निवडणूक ३ मे रोजी पार पडली आणि ४ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
महायुतीच्या शेतकरी विकास पॅनल आणि महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनल यांच्यात थेट लढत झाली. त्यात महायुतीचे १० तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी झाले.
विजयी उमेदवार (प्रमुख गट व मतदारसंघ निहाय):
सहकारी संस्था प्रतिनिधी मतदार संघ:
मविआ : जयप्रसाद राजपूत (२३), संजय पाटील (१९), रामेश्वर पाटील (२१), विश्वासराव पाटील (१८)
महायुती: प्रदीप हेलगे (२१), मोहन पाटील (२०), बलदेवराव चोपडे (१९)
Service, sports and politics : दिव्यंगत्वावर मात करून सेवा, खेळ आणि राजकारण !
अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ:
महायुती: प्रभाकर इंगळे – १०८८ मते
महिला राखीव मतदार संघ:
मविआ: नीता धांडे – ९२५ मते
महायुती: सिंधुबाई ढोले – ९८३ मते
भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघ:
मविआ: गजानन खोंदले – ९७४ मते
Political Leaders : पुढाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर करावी !
इतर मागास प्रवर्ग मतदार संघ:
महायुती: मुकुंद मापारी – ११३१ मते
सर्वसाधारण वैयक्तिक मतदार संघ:
महायुती: अनिल शिंगोटे (१०८५), गणेश ताठे (१०३४), अनंता लांडे (९८०), श्रीकृष्ण जुनारे (९४५)
या विजयानंतर आमदार संजय संचेती यांच्या नेतृत्वात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करत उत्सवाचा माहोल पाहायला मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक ए. बी. सांगळे यांनी काम पाहिले.