Breaking

Ravikant Tupkar : सेवा केंद्रांच्या शासकीय शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्या!

 

Withdraw the decision to increase government fees for service centers : पूर्वीचे दर लागू करा, रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Buldhana राज्य शासनाने २५ एप्रिलपासून ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या शासकीय ऑनलाईन शुल्कात दुपटीने वाढ केली आहे. या निर्णयामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि सेवा केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सदर निर्णय त्वरित मागे घेऊन पूर्वीचे दर लागू करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रविकांत तुपकर यांनी आज जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, सामान्य नागरिकांना सेवा केंद्रांद्वारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, वय व अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र यांसारख्या अत्यावश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र शुल्कवाढीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना मिळालेला निधी कर्ज खात्यात वळवू नका !

सेवा केंद्र चालकांनीदेखील शुल्कवाढीबाबत चिंता व्यक्त केली असून, यामुळे नागरिकांचा सेवांचा वापर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महसूल, सामाजिक न्याय, ग्रामीण विकास, गृह विभाग आदींच्या १०२७ सेवा या केंद्रांद्वारे पुरवण्यात येतात.

“ही दरवाढ विद्यार्थ्यांसाठी, शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे शासनाने जनतेच्या हिताचा विचार करून ही शुल्कवाढ रद्द करावी,” अशी ठाम मागणी तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Water shortage in Khamgao : पाण्यासाठी संतप्त नागरिकांचे ‘घागरफोड’ आंदोलन

नुकसान भरपाई द्या
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, लोणार, मेहकर तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व जनावरांचे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथे वीज पडून एक बैल, एक गाय व वासराचा मृत्यू झाला आहे. तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही तुपकरांनी केली आहे.