Breaking

Blow to Congress : माजी उपाध्यक्षासह अल्पसंख्याक नेते भाजपात!

Minority leaders including former vice president join BJP : चिखलीत काँग्रेसला मोठा झटका; राजकीय हालचालींना वेग

Buldhana चिखली नगरपालिकेच्या संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल रफिक हाजी अब्दुल कादर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

त्यांच्या समवेत मोहम्मद रशीद मोहम्मद हशम, शेख सलीम शेख अहमद आणि इतर अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेश सोहळा मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत पार पडला.

Congress protest : हक्काच्या निधीवर गदा; काँग्रेसचा महायुतीविरोधात मोर्चा

अब्दुल रफिक हे चिखलीत सहा वेळा नगरसेवक, दोन टर्म उपाध्यक्ष आणि एकदा शिक्षण सभापती म्हणून कार्यरत होते. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. चिखली शहरात अल्पसंख्याक समुदायाची भक्कम मतबळ आहे, जे काँग्रेसला सातत्याने फायदेशीर ठरत आले.

Nagpur Zilla Parishad : सरपंच असताना पदाचा गैरवापर, गुन्हा दाखल!

मात्र, अलीकडच्या काळात काँग्रेसमधून अल्पसंख्याक नेत्यांचा भाजपकडे ओढा वाढत आहे. यामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतबँकेवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.