Shiv Sena leader Sanjay Raut’s venomous criticism of Prime Minister Narendra Modi : ‘सिंदूर’चा बदला पूर्ण झाल्याशिवाय युद्धबंदी कशी?
Mumbai : भारत आणि पाकिस्तानध्ये तीन दिवस संघर्ष चालल्यानंतर काल (१० मे) सायंकाळी पाच वाजता युद्धबंदीची घोषणा दोन्ही देशांनी केली. त्यानंतर सीमारेषेवरील तणाव कमी होईल, असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. इकडे युद्धबंदीवरून राजकारण पेटू लागले आहे. या निर्णयावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसतेय.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युद्धबंदीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ही युद्धबंदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे, असे सांगण्यात येते. यासंदर्भात व्हाईट हाऊसचे निवेदन बारकाईने बघितले पाहिजे. ट्रम्प यांचे X अकाऊंट बघितले पाहिजे. ट्रम्प यांच्या सुचनेवरून भारताने युद्धबंदी स्वीकारली. पण यामध्ये ट्रम्पचा संबंध काय ?
India – Pakistan War : पाकिस्तानला नमवले अन् जगाला दाखवली आपली ताकद !
पहलगाम हल्य्यामध्ये माणसं आमची ठार झाली. आमच्या २६ बहीणींचा ‘सिंदूर’ पुसला गेला. मोदींनी तर तोंड वर करून सांगितले होते की, ‘पाताल से भी ढूंढ के निकालेंगे, पुरा बदला लेंगे, छोडेंगे नही, टुकडे टुकडे कर देंगे.. ‘ , मग आता काय झालं? बदला पूर्ण न होता युद्धबंदी कशी काय स्वीकारली, असे प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
NCP Nagpur : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो रे..’चा इशारा !
बदला पूर्ण झाल्याशिवाय युद्धबंदी करायला नको होती. १४० कोटी लोकांचे आपले सार्वभौम राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी स्वीकारतो. कशाच्या आधारावर? अटी शर्ती काय, हे सुद्धा माहिती नाही. या निर्णयाने भारताला काय मिळाले, हेसुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. अशी मधातच युद्धबंदी स्वीकारल्यामुळे जगात भारताची बेअब्रू झाली आहे. पाकिस्तान तर मुर्ख देश आहेच. कारण जगभरात ते सांगत फिरत आहेत की युद्ध ते जिंकले. पण हे सर्व घडत असताना आपले पंतप्रधान चूप का, असा प्रश्न करत त्यांना हे शोभत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.