India has defeated Pakistan well, evidence is coming to light now : अनेक एकरबेसवर हल्ला करून संपवली हवाई शक्ती
भारतासोबत युद्ध करण्याची पाकिस्तानची खुमखुमी भारतीय लष्कराने केवळ तीनच दिवसांत जिरवली. या संघर्षात भारताने पाकिस्तानचे चांगलेच नुकसान केले आहे. सलग तीन रात्री हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने खरी माहिती कधीच दिली नाही. मात्र भारताने आमचे एक फायटर विमान उडवल्याची कबुली पाकिस्तानने काल (११ मे) रात्री उशिरा दिली आहे. त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे एक – एक पुरावे आता समोर येत आहेत.
भारताने पाकिस्तानचं कोणतं विमान पाडलं, याची माहिती पाकिस्तानी प्रवक्त्याने दिलेली नाही. पण एका विमानाचं थोडंसं नुकसान झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात हवेत युद्ध होत असताना फायटर विमानांचे छोटे – मोठे नुकसान होत नाही, तर पूर्ण विमानच खाली कोसळतं. कारन मिसाईलचा हल्लाच तेवढा शक्तीशाली असतो. पण आपली हार पाकिस्तानला अद्यापही स्वीकारायची नाहीये, असंच त्यांच्या प्रवक्त्याच्या सांगण्यानुसार दिसतंय. या हल्ल्यांमध्ये भारताने त्यांच्या एअरबेसवर हल्ले करत पाकिस्तानची हवाई शक्ती जवळपास संपवून टाकली आहे.
India – Pakistan War : पाकिस्तानचे लोक भिकमांगे, असदुद्दीन ओवेसींनी काढली पाकची लक्तरं !
इंडियन एअरफोर्सचे एअर ऑपरेशनलचे महासंचालक DGAO एअर मार्शल भारती यांनी माहिती देताना सांगितलं की, पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताने प्रतिहल्ल्याच्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक ड्रोन्स आणि जेट्सवर हल्ला केला. त्यांची नेमकी किती विमानं पाडली, हे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. पण त्यांचं एक विमान आम्ही पाडलं अन् ते हायटेक विमान होतं. सर्व माहिती समोर येईल, कारण अशा गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत.