Subhash Desai criticizes Chief Minister Devendra Fadnavis for forcing Hindi : मराठी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल
Mumbai : प्राथमिक, माध्यमिक अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीबाबत शिक्षण आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यानंतर त्यावर राजकीय पुढाऱ्यांपासून ते शिक्षक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांना वगळता बव्हंशी लोकांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच केलेला आहे. आता उबाठाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
यासंदर्भात बोलताना सुभाष देसाई म्हणाले, जर हिंदीची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री सांगतात, तर मग तसा आदेश का काढत नाहीत? देवेंद्र फडणवीस यांना व्यक्ती म्हणून मी विरोध करत नाहीत. पण मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी या हिंदी भाषा सक्तीच्या बाबतीत असा उल्लेख केला की, हिंदीची सक्ती होणार नाही. परंतु तसा शासन आदेश काढला नाही. शिक्षण आराखड्यामध्ये आहे, जरी राष्ट्रीय शिक्षण धोरणात नसलं आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीचा उल्लेख नाही, असं तज्ज्ञ मंडळींनीही सांगितलं आहे.
India – Pakistan War : भारताने पाकिस्तानची चांगलीच जिरवली, आता पुरावे येत आहेत समोर !
आराखड्यात हिंदीचा उल्लेख आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सांगत आहेत की, हिंदी भाषेची सक्ती नाही. मग त्यांनी तसा जिआर काढावा, सक्ती नाही हे फक्त तोंडी सांगून चालणार नाही, तर त्यासाठी जिआर काढावा लागेल, असं सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. जर आताही मुख्यमंत्र्यांनी हिंदीच्या सक्तीबाबत स्पष्टता आणली नाही. तर मराठी भाषा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराही सुभाष देसाई यांनी दिला आहे.