Breaking

Rashtriya Swayamsevak Sangh : संघ म्हणतो, ‘गांधींमुळे जगात भारताला मिळाली ओळख’

India got recognition in the world because of Gandhi : भगवान बुद्ध अन् योगाचाही उल्लेख; कार्यकर्ता विकास वर्गाचे उद्घाटन

Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधी यांच्याबद्दल आपल्या व्यासपीठावरून विधान केले, की त्याची देशभर चर्चा होते. सध्या अश्याच एका विधानाची जोरदार चर्चा रंगतेय. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या उद्घाटन सोहळ्यातील हा प्रसंग आहे. सहसरकार्यवाह यांनी आपल्या भाषणात ‘भगवान बुद्ध, गांधी अन् योगामुळे भारताला जगात ओळख मिळाली’ असा उल्लेख केला. त्यानंतर साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले.

सहसरकार्यवाह आलोक कुमार म्हणाले, ‘संघाचा वर्ग हा राष्ट्रीयतेची अनुभूती देणारा आहे. येथे शिक्षार्थ्यांना देशातील विविधतेचे दर्शन होते. तसेच भारतात विविधता असली तरी मूळ विचार एकच आहे याचादेखील अनुभव सर्वांना होईल. सर्वांसाठी येथे भगवा ध्वज हाच गुरू असतो. बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशीच या वर्गाची सुरुवात होत आहे. भगवान बुद्ध, गांधीजी आणि योग यांच्यामुळे जगात भारताची ओळख निर्माण झाली आहे.’

MLA Sajid Khan Pathan : राज्यघटनेमुळेच भारतात मुस्लिमांचे अस्तित्व टिकले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा (विशेष) शुभारंभ नागपूर रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सोमवारी सकाळी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधर तसेच वर्ग सर्वाधिकारी व पुर्व उडीसा प्रांताचे संघचालक समीर कुमार मोहंती हेदेखील उपस्थित होते.

संघाच्या प्रक्रियेत प्रशिक्षण वर्गांचे मोठे महत्त्व आहे. कार्यकर्ता वर्ग द्वितीय (अगोदरचा तृतीय वर्ष वर्ग) याचे आयोजन केवळ नागपुरात होते. यंदाच्या वर्गात देशभरातून आलेले ८४० शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधूनदेखील शिक्षार्थी वर्गात आले आहेत. या वर्गात संघाच्या प्रांत व क्षेत्र स्तरावरील वर्गांत प्रशिक्षण घेतलेले ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या २५ दिवसांच्या वर्गाचा सार्वजनिक समारोप ५ जून रोजी होईल.

या प्रशिक्षण वर्गात समाज जागरण आणि सामाजिक परिवर्तन याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. ठराविक कालावधीतच कार्यकर्त्यांचा लवकर विकास व्हावा आणि त्यांच्या माध्यमातून संघकार्याची वाढ व्हावी हाच या वर्गाचा उद्देश आहे. कार्यकर्ता क्रमशः विकसित होतो आणि त्यातूनच कार्यविस्ताराची गती वाढते, असं ते म्हणाले.

CM Devendra Fadnavis : पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तानसाठी स्पष्ट इशारा

तामिळनाडू, केरळ व अनेक राज्यांत कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागला व तेथून तेथेदेखील संघटन वाढीस लागले. १९२७ मध्ये नागपुरात प्रशिक्षण वर्गाची सुरवात झाली. त्यानंतर आता देशभरात शेकडो वर्ग दरवर्षी होतात. मात्र नागपुरच्या पवित्र मातीतच कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचे आयोजन हे कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असते व येथील संस्कार घेऊनच ते समाजात जातात, असे आलोक कुमार यांनी सांगितले.