BSP confident of winning local elections : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी संघटनेचा आढावा
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. इतर पक्षांप्रमाणेच बहुजन समाज पक्षानेदेखील तयारीला सुरुवात केली आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत प्रदेशाध्यक्ष ॲड.सुनिल डोंगरे यांनी संघटनेचा आढावा घेतला. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठीच असतात. जे कार्यकर्ते जिंकून येण्याची क्षमता ठेवतात, अशा सर्व कार्यकर्त्यांना या निवडणुकीत तिकीट देऊन त्यांना जिंकवण्याचे कार्य पक्ष केल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या यशाचा विश्वास बसपने व्यक्त केला आहे.
मागील काही काळापासून नागपुरात बसपाच्या हत्तीची चाल संथावली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करून पक्षाला तळागाळापर्यंत परत पोहोचविण्याचे मोठे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर राहणार आहे. बसपाच्या प्रदेश कार्यालयातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशानुसार लवकरच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
DCM Eknath Shinde : गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे
बहुजन समाज पार्टी स्वबळावर या सर्व निवडणुका लढणार आहे. नागपुरातील कार्यकर्त्यांच्या तयारीची समीक्षा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नागपुरात आले होते. बसपाचे राज्याचे मुख्यालय नागपूर असल्याने २६ मेपासून ३० मेपर्यंत स्वतः प्रदेशाध्यक्ष स्वत: नागपुरात राहून विदर्भातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघाचा आढावा घेतील, असेही त्यांनी यावेळी घोषित केले.
Mahadeo Jankar : वाटाघाटी बरोबर करा, नाहीतर एनडीएला रामराम ठोकू!
लोकसभा, विधानसभा निवडणूकीत बसपाला अपेक्षित मतं मिळू शकली नव्हती. अगदी बसपाचा प्रभाव असलेल्या भागातूनदेखील उमेदवारांना मते मिळाली नव्हती. त्यामुळे मनपा निवडणूकीत बसपाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, मंगेश ठाकरे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी रंजनाताई ढोरे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, उमेश मेश्राम, इब्राहिम टेलर, यशवंत निकोसे, राजू चांदेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.