Congress leader Vijay Wadettiwar alleges that the decision to conduct caste census for the Bihar elections : ओबीसींची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर फळं भोगावे लागतील
Nagpur : देशात जातिय जनगणना करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. परंतु केंद्रातील सरकारने कित्येक वर्ष यासंदर्भातील निर्णय लांबवला. आता बिहार निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सरकारने जातिय जनगणाना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या परिस्थितीत जातीय जनगणना त्यांच्यासाठी क्रमप्राप्त होती आणि त्यांची ती आवश्यकता होती, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांनी आज (१३ मे) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले जातिनिहाय जनगणनेत ओबीसींची संख्या कुणी कमी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याची फळे त्यांना भोगावी लागणार आहेत. असा प्रयत्न कुणीही करू नये. कारण याकडे आमचे जातीने लक्ष असणार आहे. त्यामुळे जातिनिहाय जनगणना सरकारने पारदर्शकपणे करावी. त्यामध्ये कुठलीही गडबड करू नये.
India – Pakistan War : मोदींचं भाषण अमेरिकेला इशारा देणारं असायला हवं होतं !
एकही आमदार नसताना चपला झिजवताहेत..
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सत्तेच्या बाहेरील सत्ताकेंद्र आहेत. सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज भासायला लागली आहे. पण राज ठाकरे केवळ त्यांच्या चपला झिजवत आहेत. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्या पक्षाकडे जाऊन यांना चपला झिजवाव्या लागत असतील, तर त्यांची स्थिती किती दोलायमान आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जनाधार गमावण्याची भीती त्यांना आहे. आगामी निवडणुका जिंकण्यीच शक्यता दिसत नसल्याने महायुतीचे नेते राज ठाकरेंच्या भेटी घेत आहेत, असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला.