Breaking

Akola BJP : अकोल्यात भाजपचे ओबीसी कार्ड; जयंत मसनेंवर विश्वास कायम!

Jayant Masne reappointed as Akola Mahanagar President : महानगर अध्यक्षपदी नियुक्ती; संतोष शिवरकर यांच्याकडे ग्रामीण

Akola अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत भाजप महानगर आणि ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी अनुक्रमे जयंत मसने आणि संतोष शिवरकर यांच्याकडे सोपवली आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

जयंत मसने हे माजी नगरसेवक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच मानवी सेवेच्या उपक्रमात नेहमी अग्रेसर राहिले आहेत. संयमी स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शैली आणि पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांच्यावर पुन्हा अकोला महानगर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यांची नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आली.

BJP District President : पश्चिम नागपूर मागितले होते, दयाशंकर तिवारींकडे अख्खे शहर दिले!

संतोष शिवरकर हे स्व. बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आहेत. सध्या अकोट पंचायत समितीचे उपसभापती आहेत. ते कुणबी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. भाजप युवा मोर्चातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण भागातील संघटन विस्तारात त्यांचे कार्य लक्षात घेता अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

या दोन्ही नियुक्त्या भाजपने ओबीसी समाजातील दोन प्रमुख घटक – माळी आणि कुणबी समाजाला संघटनात्मक नेतृत्व देत केल्या आहेत. ग्रामीण आणि शहरी दोन्ही पातळ्यांवर पक्षबांधणी मजबूत करण्याचा पक्षाचा निर्धार यातून स्पष्ट होतो.

Buldhana BJP : भाजपचा विश्वास शिंदेंवरच; बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

आपल्या निवडीबद्दल दोन्ही नेत्यांनी संजय धोत्रे, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारताकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर, विजय अग्रवाल, तेजराव थोरात यांचे आभार मानले.

“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या तत्वांचा अंगीकार करून अकोला जिल्ह्यात भाजप बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे दोघांनी स्पष्ट केले आहे.