Breaking

Disaster Management : युवकांनो..! सिव्हिल डिफेन्स वॉरिअर व्हा !

Youth..! Now become a civil defense warrior, appeals Chandrakantdada Patil : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Mumbai : सद्यस्थितीत भारतावर युद्धाचे सावट आहे. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रत्येकाने गिरवणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांनी सक्रीय सहभागी होणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ‘My भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

केंद्रीय युक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांतील राष्ट्रीय सेवा योजना NSS पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. https://mybharat.gov.in/pages/civil_registration या लिंकवर नोंदणी सुरू असल्याची माहिती यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ही नोंदणी जिल्हा स्तरावर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Gopal Datkar : गोपाल दातकर यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

नोंदणी करताना विद्यार्थी आठवड्यातून किती तास सेवा देऊ शकतात, हेसुद्धा नमूद करायचे आहे. जिल्हास्तरावर नोंदणी केल्यानंतर ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली जाणार आहे. आपत्कालीन किंवा युद्धजन्य परिस्थितीत या सिव्हिल डिफेन्स वॉरिअर्सची मोठी मदत देशाला होणार आहे. त्यामुळे ‘देशसेवेसाठी पुढे या – सिव्हिल डिफेन्स वॉरिअर्स व्हा’, असा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, त्या शेतकऱ्यांना वीज बिलात सलवत नाही

सद्यस्थितीत देशात जे वातावरण आहे. पाकिस्तानने पुन्हा काही कुरापाती केल्यास युद्ध केव्हाही सुरू होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा इशाराच पाकिस्तानला दिला आहे. त्यामुळे युवकांनी आता देशासाठी पुढे येण्याची गरज आहे. ‘My भारत’ पोर्टल यामध्ये मोलाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे युवकांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.