Breaking

Siddharth kharat: लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन थिरकले आमदार!

MLA flaunts sword during wedding procession : सिद्धार्थ खरात यांचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेऊन गाण्याच्या तालावर नाचतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आमदार खरात एका लग्नाच्या वरातीत सहभागी झाले. ते हातात तलवार घेऊन नाचताना दिसून येत आहे. ही कृती कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Pankaja Munde : समुपदेशनाने होणार पशुसंवर्धन विभागातील ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्या !

कायद्याचे भान असलेल्या आमदारांकडून अशी कृती?
सिद्धार्थ खरात हे पूर्वी प्रशासकीय सेवेत होते. त्यामुळे त्यांना कायदेशीर बाबींचे भान असणे अपेक्षित आहे. सध्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत असताना सार्वजनिक ठिकाणी तलवार हातात घेऊन नाचणे, हा समाजात चुकीचा संदेश देणारा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

आधीही अशा घटनांवर कारवाई झाली आहे
महाराष्ट्रात यापूर्वीही लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन नाचल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तलवार वापरून केक कापल्याच्या प्रकरणात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Appointments of BJP District Presidents : संघटनमंत्र्यांचा दबदबा कायम राहणार ?

प्रशासन कारवाई करणार का?
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. प्रशासन आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.