Breaking

Income Tax Department : अमरावती, यवतमाळ, अकोल्यातील सोन्याचांदीच्या दुकानांवर धाडसत्र !

Raids on gold and silver shops in Amravati, Yavatmal, Akola :आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू

Amravati : आयकर विभागाने पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये आज (१४ मे) सकाळपासून धाडसत्र सुरू केले आहे. सोन्याचांदीच्या दुकानांना विभागाच्या चमूने पूर्णपणे घेरले आहे. अधिकारी दुकांनामध्ये बसून कसून तपासणी करत आहेत. ज्वेलर्स दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी अजूनही सुरू आहे.

अमरावती शहर, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा, यवतमाळ आणि अकोला येथे एकाच वेळी आयकर विभागाची छापामार कारवाई सुरू झाली. विदर्भात आजवर झालेल्या कारवायांपैकी ही मोठी कारवाई मानली जात आहे. अमरावतीच्या एकता आभूषण या दुकानाच्या आत विभागाचे अधिकारी आहेत. तेथे मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची कसून विचारपूस सुरू आहे.

Amol mitkari : पहिले अजितदादांची माफी मागा, नंतरच पुढची चर्चा

तिन्ही जिल्ह्यांमध्ये अधिकारी ज्वेलर्सच्या दुकांनामध्ये साहित्य, कागदपत्र, बॅंकांचे खाते, कॉम्प्यूटर आणि मालक व व्यवस्थापकांचे मोबाईल तपासले जात आहेत. सोबतच परतवाडा शहरातही अनेक दुकांनांवर छापामार कारवाई सुरू आहे. येथे पुनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, इशा ज्वेलर्स आणि अन्य दुकांनामध्ये आयकर विभागाची चमू ठाण मांडून बसलेली असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे सोन्याचांदीच्या व्यवसायात गैरव्यवहार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Siddharth kharat: लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन थिरकले आमदार!

बनावट कागदपत्रं, खोट्या खरेदी – विक्रीच्या नोंदी, जीएसटी बुडवला आहे का, कर चुकवला आहे का, बॅंक खात्यांचे स्टेटमेंट्स, व्यवहारांचे रेकॉर्ड्स, संगणक आणि मोबाईल फोनची कसून तपासणी केली जात आहे. कारवाईत नेमके काय आढळले, याची माहिती, अद्याप मिळू शकली नाही. परंतु कारवाई पूर्ण होताच याची माहिती माध्यमांना दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.