Millions of tons of ash were stored without any permission : आरोग्यासाठी धोकादायक, आमदार दाम्पत्याने प्रशासनाला धरले धारेवल
Amravati रहाटगाव-वडगाव मार्गावरील महामार्ग उड्डाणपुलाच्या कामासाठी साठवलेली लाखो टन राख कोणतीही परवानगी न घेता ठेवण्यात आली असून, ती पूर्णतः अनधिकृत असल्याचे आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांच्या संयुक्त पाहणीतून उघड झाले आहे. या ठिकाणी साठवण्यात आलेल्या राखेचे कण हवेत उडत असल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पण प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.
या बाबत रहिवाशांनी तहसीलदार विजय लोखंडे यांना अनेक वेळा फोनवरून तक्रारी करूनही त्यांनी “हा आमचा विषय नाही,” असे सांगून कार्यवाही टाळली. मात्र आमदार खोडके दाम्पत्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर प्रशासन हलले असून आता संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Youth Congress : युवक काँग्रेसकडे बॅनर, पोस्टरचेही पैसे नाहीत!
रहाटगाव रिंगरोड टी-पॉइंटजवळ उड्डाणपुलासाठी उघड्यावर साठवलेली राख ही नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे. नागपूर-अमरावती महामार्गावरील या ठिकाणी उडणाऱ्या राखेमुळे नागरिक, व्यावसायिक आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जांडू कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी नियोजित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड केल्याचे समोर आले आहे. वृक्ष जाळल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत. एनएचएआयकडून केवळ बांधकाम साहित्य साठवण्याचीच परवानगी घेण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात राख आणि उत्खनन साहित्य बेकायदेशीररीत्या साठवण्यात आले आहे.
Eknath Sinde Shiv Sena : काल पक्षात आले, आज कार्याध्यक्ष झाले!
या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संजय पाटील, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. २४ एप्रिल रोजी राख हटवण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आता कठोर पावले उचलण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई फौजदारी स्वरूपाची ठरू शकते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राखेचा ढिगारा निर्जन भागात हलवण्याची गरज आहे. निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा प्रशासनाचा इशारा आहे.