Breaking

MLA Pravin Tayade : आमदारांनी गायले गाणे… ‘आज मौसम बड़ा बेईमान है’!

Video of MLA’s song goes viral on social media : विवाह सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Amravati प्रत्येकाचाच काही ना काही छंद असतो. सार्वजनिक पदावर असताना अनेकदा हे छंद मागे पडतात. मात्र अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांना मात्र मोह आवरता आला नाही. नुकत्याच एका लग्नसमारंभात आमदार तायडे यांनी हिंदी सिनेसंगीताच्या माध्यमातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचा गायनाचा हा अंदाज आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

अचलपूरचे आमदार एका विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. समारंभात ऑर्केस्ट्राच्या सुरांमध्ये गुंतलेल्या आमदार तायडे यांना गाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी माईक हातात घेतला आणि थेट ‘आज मौसम बड़ा बेईमान है…’ हे गाणं सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

Prahar Janshakti : जिल्हाधिकारी कार्यालयातच ठोकला मुक्काम!

त्यानंतर आमदारांनी दुसरं एक भावपूर्ण गीत —
“क्या हुआ है, हुआ कुछ नहीं है…
बात क्या है, पता कुछ नहीं है…
इसमें मेरी कोई खता हो गई है…
खूबसूरत है तू, रुत जवान है…”
अशा ओळी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.

Sanjay Khodake, Sulabha Khodake : लाखो टन राख उठतेय नागरिकांच्या जीवावर!

आमदारांच्या आवाजातील ही सादरीकरणाची झलक लवकरच मोबाईल कॅमेरात कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांच्या या अंदाजाने मतदारसंघात नव्या चर्चांना उधाण आले आहे. “आमदार तायडे यांच्यात अजून कोणते छुपे कलागुण असतील?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. गंभीर राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही आपला कलाविष्कार जपणाऱ्या आमदार तायडे यांचा हा अंदाज त्यांच्या मतदारसंघातील जनतेसाठी वेगळा अनुभव ठरला आहे, हे निश्चित!