Revenue Minister says, Sanjay Raut destroyed Shiv Sena : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला संजय राऊत यांचा समाचार
Nagpur : शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या जेलमधील अनुभवांवर ‘नरकातला स्वर्ग’ Heaven in Hell हे पुस्तक लिहिले आहे. उद्या (१७ मे) या पुस्तकाचे अनावरण होणार आहे. पण त्यापूर्वीच हे पुस्तक चर्चेत आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबतीत गंभीर स्वरुपाचे दावे करण्यात आले आहेत. यावरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडवी टीका केली आहे.
नागपुरात आज (१६ मे) पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, संजय राऊतांच्या पुस्तकाचे नावच चुकलं आहे. ते नाव बदलून ‘नरकातला राऊत’ असं केलं पाहिजे. यासाठी मी संजय राऊत यांना पत्र पाठवणार आहे. पुस्तकात त्यांनी स्वतःचं राजकीय अधपतन कसं केलं, याचा लेखाजोखा मांडला आहे. आपल्या नैतिक दिवाळखोरीची कहाणी त्यांनी लिहीली आहे. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेऊन उद्धव ठाकरे यांना त्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधलं.
Mahavikas Aghadi : महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत आम्ही शिवसेनेसोबत !
भाजप – शिवसेना युती उत्तम होती. या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचे काम केले. पण संजय राऊत सारख्या व्यक्तीने शिवसेना संपवण्याचे काम केले. २०१४ ते २०१९ या युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या भावाप्रमाणे उद्धव ठाकरे यांना सन्मान दिला, हे मी दाव्याने सांगू शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी नातं जोडून ठेवलं. त्यानंतर २०१९ मध्ये मीच ठाकरेंचा सेनापती, असं सांगत पुढील काम राऊतांनी केलं, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.
मानसीक दिवाळखोरीचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जगभर कौतुक होत आहे. पुस्तकात न्यायालयाच्या विरोधतही काही कंटेंट आहे, त्याचा तपास केला पाहिजे. न्यायालयाच्या निकालावरही काही बाबी पुस्तकात आल्या आहेत. न्यायालयाचा अवमान होईल, असा कंटेंट पुस्तकात आला आहे. मोदी – शाह यांना निर्दोष सोडले, असे लिहीत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन ते बदनाम करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Marathwada : दादा का वादा; दीड महिन्यात दिले दोन ‘सीट्रीपलआयटी’
२०१९ मध्ये केलेली चूक शिवसेनेला बरबाद करत आहे. आता या पुस्तकाने काय होणार? देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचे काम पुस्तकाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. पुस्तक बॅन करण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्याचा निर्णय संबंधित यंत्रणा घेईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.