File a treason case against BJP minister Vijay Shaha : काँग्रेसची मागणी, तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
Buldhana पाकिस्तानवरील भारतीय एअर स्ट्राईकची माहिती देशाला देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी केलेल्या बेताल विधानाचा चिखली काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी काँग्रेसतर्फे तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन विजय शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशाचे जवान जात-पात न पाहता सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असतात. त्यांच्या कार्याबद्दल देशभरातून गौरव होत असतानाही भाजपचे मंत्री जातीवर आधारित द्वेषयुक्त विधाने करून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे.
RTO Department : पुसद येथे आरटीओ कॅम्पमध्ये तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधातील वादग्रस्त विधानाबद्दल मंत्री विजय शहा यांनी तात्काळ माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Mahavikas Aghadi : महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत आम्ही शिवसेनेसोबत !
“जर शासनाने वेळेवर योग्य कारवाई केली नाही, तर चिखली काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील,” असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीने दिला आहे. निवेदनप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष अतहरोद्यनी काझी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, डॉ. मोहमंद इसरार, प्रा. निलेश गांवडे, प्रा. राजू गवई, युवक काँग्रेसचे रिक्की काकडे, डॉ. अमोल लहाने आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.