Breaking

Asha Workers : डेटा एन्ट्रीसाठी तात्काळ ऑपरेटर नियुक्त करा

Demands for to hire an operator for data entry : अशा वर्कर्सची मागणी, २० मेपासून संपावर जाण्याचा सरकारला इशारा

Nagpur आशा वर्करला डेटा एण्ट्रीचे काम जबरदस्तीने सोपविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊन त्यांना विविध आजार जडत आहेत. कामाचा ताण वाढल्यामुळे आशा वर्करला डोळ्यांचे विकार, गुडघेदुखी, मानेची नस, पाठीचा कणा दुखणे, किडनीचे आजार, हृदयरोग, क्षयरोग, अर्धांगवायू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेटा एन्ट्रीसाठी तात्काळ ऑपरेटरची नेमणूक करावी, अशी मागणी राज्यातील आशा वर्कर्सने केली आहे.

राज्यातील आशा वर्कर्सने सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जर डेटा एन्ट्रीसाठी ऑपरेटर्सची नियुक्ती तत्काळ झाली नाही तर २० मे पासून संपावर जाण्याची तयारी दाखविली आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वर्कर्सने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. आशा वर्करला नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी मोकळीक द्यावी, आशा वर्करची डिसेंबरपासून थकीत रक्कम त्वरित द्यावी, अश्या मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

Samruddhi Mahamarg : मुरुम पोखरल्याने समृद्धी महामार्गाला धोका!

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्करला केंद्र शासनाच्या योजनेनुसार काही व राज्य शासनातर्फे काही मोबदला देण्यात येतो. यातील राज्य शासनाचा मोबदला आशा वर्करला मिळाला. परंतु केंद्र शासनाचा डिसेंबर महिन्यापासूनचा मोबदला न मिळाल्यामुळे आशा वर्करमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच निवृत्तीनंतर ५ लाख एकमुस्त ग्रॅच्युईटी, १० हजार पेन्शन, शासकीय सेवेत समायोजन करावे, आशा योजना स्थायी करावी आदी मागण्या अपर जिल्हाधिकारी अनुप खांडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.