Breaking

Crop loan : पीक कर्ज नाकारणाऱ्या बॅंका येणार अडचणीत !

Banks that deny crop loans will face trouble, Chandrashekhar Bawankule warns of action : शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय करू नका

Nagpur : पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ नये, यासाठी प्रत्येक तालुक्याला उपविभागीय दंडाधिकारी, अग्रणी बॅंक व्यवस्थापक यांनी वेळोवेळी रितसर आढावा घेतला पाहिजे. संबंधित बॅंका निर्देश देऊनही ऐकत नसतील, तर त्यांच्या विरोधात गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्न राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बॅंका आता अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.

नियोजन भवन येथे काल (१६ मे) झालेल्या बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. या बैठकीला आमदार डॉ. आशिष देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, प्रभारी पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, माजी आमदार सुधीर पारवे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक मोहित गेडाम व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tiranga Yatra : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या शौर्यासाठी बल्लारपूरात तिरंगा यात्रा !

शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा, या उदात्त हेतूने शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली. शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. जे शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेत करून शकले नाहीत, त्यांनी ओटीएम समझोता अंतर्गत कर्जाची रक्कम फेडली. ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करूनही ज्या बॅंकांनी त्यांना पीक कर्ज दिले नाही, त्या बॅंकांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.