Breaking

Tribal department : आदिवासींसाठी महाअभियान ठरले फायद्याचे

Dharati Aaba campaign proved beneficial for tribals : ‘धरती आबा’ आणि ‘प्रधानमंत्री न्याय महाअभियान’मुळे गावांमध्ये सकारात्मक बदल

Amravati आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने राबवलेली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ आणि ‘प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान’ ही दोन्ही मोहीम अमरावती जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी संजीवनी ठरत आहेत. या माध्यमातून मूलभूत सुविधा गावांपर्यंत पोहोचत असून, समाजात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

या अभियानांतर्गत पक्की घरे, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सौरऊर्जा, मोबाईल नेटवर्क, गॅस जोडणी, वसतिगृहे, पोषण आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुविधांपासून वंचित असलेल्या कुटुंबांना थेट लाभ मिळू लागला आहे.

Local Body Elections : जेवढे पक्ष तेवढे इच्छुक; युती-आघाडीपुढे पेच!

‘प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान’ अंतर्गत धामणगाव रेल्वे तालुक्यातील तीन गावांचा समावेश असून, येथील 334 आदिम जमातींच्या लोकसंख्येला अभियानाचा लाभ मिळत आहे. उसळगव्हाण (17) आणि बोरगाव धांडे (4) येथील एकूण 21 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, यातील 20 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 2025-26 मध्ये नायगाव येथील 20 नवीन लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येणार आहेत.

Amravati Municipal Corporation School : अमरावती महापालिकेच्या आठ शाळांमध्ये खिचडी घोटाळा!

‘धरती आबा’ अभियानांतर्गत अमरावती, अचलपूर, भातकुली, चांदुरबाजार, चिखलदरा, दर्यापूर, धारणी, मोर्शी आणि वरुड या 9 तालुक्यांतील 321 आदिवासीबहुल गावांचा समावेश आहे. धारणी प्रकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 6 नवीन वसतिगृहे (2 मुलांचे व 4 मुलींचे) मंजूर झाली आहेत. तसेच मेळघाट परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रशिक्षण, बाजारपेठ निर्माण आणि आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, “धरती आबा व प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानामुळे आदिवासी भागात शाश्वत विकासाची पायाभरणी होत आहे. मूलभूत सुविधा थेट गावांपर्यंत पोहोचत असून त्यातून जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे.”