Breaking

PM Awas Scheme : पंतप्रधान आवास योजनेतील आठ लाभार्थ्यांनी प्लॉट विकले!

Beneficiaries of the Prime Minister’s Housing Scheme sold plots : महापालिकेचा दंडुका; फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार

Akola पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊन पहिला हप्ता मिळवल्यानंतर थेट प्लॉटच विकणाऱ्या आठ लाभार्थ्यांविरोधात अकोला महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. संबंधितांनी पहिल्या हप्त्याची रक्कम परत न केल्यास त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

या योजनेत लाभार्थ्यांना चार टप्प्यांत अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यातील पहिला हप्ता (७० हजार रुपये) लाभार्थ्यांच्या खात्यावर प्लिंथचे काम पूर्ण झाल्यानंतर जमा केला जातो. मात्र या आठ लाभार्थ्यांनी हे काम पूर्ण करून पैसे घेतले आणि त्यानंतर आपल्या प्लॉटची विक्री करून योजना नियमांचा भंग केला.

Debt restructuring scam : जिल्हा बँकेच्या चौकटीत अडकले ११ जण

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील हप्त्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी करताना प्लॉट विक्रीचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या सर्व लाभार्थ्यांकडून “पाच वर्षे घर विकता येणार नाही” अशा अटीचे शपथपत्रही घेण्यात आले होते. तरीही त्यांनी नियम धाब्यावर बसवले.

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, लाभार्थ्यांना मिळालेली अनुदानाची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नियमभंग केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, असे संकेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Dr. Nitin Dhande : महापालिकेत पुन्हा भगवा फडकणार, जिल्हाध्यक्षांना विश्वास

इतर जिल्ह्यांनी घेतला धसका
अमरावतीप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चौकशी झाल्यास आणखी काही प्रकरणे उघडकीस येऊ शकतात. त्यामुळे आता प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे.