Breaking

Heaven in hell : संजय राऊत यांनी पत्रा चाळीतील भ्रष्टाचार बाहेर काढला, अन् त्यांनाच जेलमध्ये टाकलं !

NCP leader Sharad Pawar’s reaction on Sanjay Raut’s book : काही लोक चुकीचं काम करतात, हे माहिती असूनही कारवाई होत नव्हती

Mumbai : पत्रा चाळीच्या संदर्भात आरोप करून खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात संजय राऊत यांनी पत्रा चाळीत होणारा भ्रष्टाचार आपल्या लेखणीच्या माध्यमातून बाहेर काढला होता. देशाच्या प्रमुख लोकांना त्यांनी या बाबी कळवल्या होत्या. पण त्यांच्यावर कारवाई करायचे सोडून राऊत यांनाच जेलमध्ये टाकण्यात आलं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर दिली.

यासंदर्भात शरद पवार म्हणाले, संजय राऊत ‘सामना’मध्ये नेहमीच रोखठोक भूमिका मांडत असतात. आपल्या स्वभावाप्रमाणे ते लिहीत असतात. पण त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती. त्यामुळे ते अस्वस्थ होते. ते मोठ्या संधीची वाट पाहात होते आणि पत्रा चाळीने त्यांना ती संधी दिली. पत्रा चाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहात होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या चाळीतील लोकांना घरे मिळावी, अशी मागणी घेऊन काही लोक संजय राऊत यांच्याकडे गेले होते.

Jay Hind Yatra : जय हिंद तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा सेनेवर विश्वास दाखवाल !

राऊत यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले लोक होते, त्या शासकीय यंत्रणेतील लोकांना यामुळे संधी मिळाली. ईडीचं योगदान या प्रकरणात मोठे आहे. ईडीने जी केस केली, त्यामध्ये संजय राऊत यांचा क्विंचीतही संबंध नव्हता, तरीही त्यांना गुंतवण्यात आलं. जेथे अन्याय होतो, तेथे त्याविरोधात ‘सामना’ उभा हारतो. त्यांचं ते काम अखंडपणे सुरू होतं. शासकीय यंत्रणांमध्ये जेथे भ्रष्टाचार आहे, त्याविरोधात ते नेहमीच लिहीतात, असे शरद पवार म्हणाले.

मुंबई आणि महाराष्ट्रात काही लोक चुकीचं काम करत आहेत, हे माहिती असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. त्यामुळे संजय राऊत यांनी देशाच्या प्रमुखांना यासंदर्भात पत्र लिहीले. जे लोक शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात, याचं सविस्तर लिखाण राऊत यांनी केंद्र सरकारला कळवलं. त्यामध्ये जवळपास ३० – ३५ लोक असे होते, कंपन्या अशा होत्या की, ज्यांच्याकडून पैसे काढले गेले. ती रक्कम ५८ कोटींच्या जवळपास होती.

PM Awas Scheme : पंतप्रधान आवास योजनेतील आठ लाभार्थ्यांनी प्लॉट विकले!

संजय राऊत यांना ही माहिती मिळाल्यावर ती त्यांनी लेखी स्वरुपात देशाच्या प्रमुख लोकांना दिली. त्यावर कारवाई तर झालीच नाही. पण संजय राऊतांनाच जेलमध्ये जावं लागलं. त्यांना अटक करण्यात आली. १०० दिवस तेथे त्यांना राहता आलं. त्यावर त्यांनी हे पुस्तक लिहीलं. आता आम्हा लोकांना पुस्तक वाचल्यावर कळेल की तेथील स्थिती काय आहे, ती स्थिती दुरुस्त करण्याचा विचार आज ना उद्या आपल्याला करावाच लागेल, असे शरद पवार म्हणाले. जेलमधील त्यांच्या सगळ्या आठवणी आणि अनेकांच्या भेटीगाठी व त्यांचा अनुभव आपल्या लक्षात येणार आहे, असेही पवार म्हणाले.